बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा
प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥
गगनभेदी माया तरी पडते ती उणी
लोभाच्या सीमाही वाढती झणी
चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी
माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी
मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥
प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे
कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे
रस्ता वा चौकासही नाव मम पुरे
"भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे
शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥
जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती
'फोडा अन राज्य करा' हीच तर निती
धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती
शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती
पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥
गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो
लक्ष्मी, कीर्ती, सत्ता फक्त स्वजनी ही ठसो
वचनी, लेखनीही स्वजनोद्धार हा दिसो
सतत 'उन्नती' हाच मंत्र अंतरी ठसो
देह पडो, मूर्ती असो ही असे स्पृहा॥४॥
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची मूळ कविता:
बहु असोत सुंदर संपन्न की अहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥
गगनभेदी गिरिवीण अणू नच जिथे उणे
आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवरी जेथिल त्या तुरगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय न दाविणे
पौरूषासी अटक गमे जेथ दु:सहा॥
प्रासाद कशास जेथ हृदय मंदीरे
सद्भावांचीच दिव्य भव्य आगरे
रत्ना वा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा गृहा॥
विक्रम वैराग्य एक जागी नांदती
जरीपटका भगवा झेंडा ही डोलती
धर्मराज कारण समवेत चालती
शक्ती युक्ती एकवटूनी कार्य साधती
पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वहा॥
गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो
स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडो तत्कारणी ही असो स्पृहा॥
Monday, April 27, 2009
Wednesday, April 22, 2009
भीषण सुंदर
कधी कधी एखादी गोष्ट डोक्यात पक्की बसून रहाते. ती खूप छान, सुंदर, अप्रतिम, या आणि तत्सम विशेषणांनी गौरवावी अशी असतेच असं नाही. कधीतरी असं वाटतं की ही फलाणी गोष्ट इतकी भुक्कड आहे की ते वाचून, पाहून, ऐकून हसू दाबता येत नाही आणि हे हास्य पसरवण्यासाठीही त्या टुकार गोष्टीला आपणच प्रसिद्धी द्यावी असं वाटतं. बर्याच दिवसांपासून डोक्यात एक नाच-गाणं आहे, अर्थातच हिंदी सिनेमातलं.इथे पहा ते! http://www.youtube.com/watch?v=sotm1QDsuV0&feature=related
आता सुरूवार करू या सुरूवातीपासूनच! तर सुरूवातील विजा चमकतात, पार्श्वभूमीवर एक बाई भेसूर हसते ज्यावर आपल्याला ना हसायला येतं ना रडायला! आणि मग दिसतो हा आपला हॅण्डसम हंक! कोण रे ते कोपर्यातून 'हा हंत, हा हंत' म्हणत आहे? त्याच्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं आहे. तुम्ही पोरं राखी सावंत, मल्लिका शेरावत वगैरे ओंगळ बायकांना "सुंदर" म्हणता तेव्हा मी काही बोलते का? मग मी या बाब्याला, काय बरं याचं नाव... जे काय असेल ते, मी याला ठोंब्या म्हणणार. ठोंब्या हे माझं आवडत्या नावांपैंकी एक, मी लहान असताना आई मला ठोंबीच म्हणायची (वुडवर्ड्स ग्राईप वॉटरची जाहिरात आठवली का नाही?). तर हा, तर हा आपला हॅण्डसम हंक, ठोंब्या, हातात फूल ना फुलांचा गुच्छ घेऊन सुरूवात करतो, नाचायला हो! तुम्हीकाय समजलात, गाणं म्हणायला? नाही, ते ही करतो तो, पण थोडं उशीरा. आता या प्राण्याला हीरो का म्हणायचं? कारण हिंदी पिच्चरमधे नाच गाणं फक्त हीरोलाच असतं नाहीतर साईड हीरोला. पण ठोंब्या किनई एवढा सुंदर आहे की त्याला साईड हीरो कसं म्हणणार? शिवाय हिंदी पिच्चरमधे आख्खं गाणं फक्त साईड हीरो किंवा साईड हिरविणीवर 'वाया' घालवतात का? तर त्यामुळे आमचा सुंदर ठोंब्या या पिच्चरचा हीरोच आहे. आता या पिच्चरचं नावबिव आठवत नाही. पण नक्की घरी पाहिला असणार हासुद्धा पिच्चर!
मी बारावीत असताना घरी केबल घेतली. दुपारी मी आणि बाबा जेवायला बसायचो तेव्हाच फक्त टी.व्ही. पहायचो. कामांची विभागणी ठरलेली होती, म्हणजे बरीचशी कामं बाबाच करायचे. जेवण गरम करणे, माझी वाट बघणे, मी घरी येऊन, हात-पाय धुतले आणि बसले तशीच की एकदा मला 'कपडे बदलून घे' असा प्रेमळ, खरंच प्रेमळ हो, सल्ला देणे, मी कपडे बदलताना जेवण वाढणे, अशी सगळी कामं बाबा करायचे. मग मी ताटं घेऊन बाहेर आणायचे आणि आम्ही दोघे जमिनीवर स्थानापन्न व्हायचो. मग न चुकता आम्हाला आठवण व्हायची की टी.व्ही. बंद आहे, आणि रिमोट टी.व्ही. जवळच आहे. हे काम मात्र मीच करायचे, उठून मुख्य बटन लावणे आणि रिमोट बाबांच्या हातात देणे. ते अगदी प्रेमाने ही रिमोटचीही जबाबदारी घ्यायचे, पण नियम एकच, जो चॅनल सुरू असेल तो बदलायचा नाही. बर्याचदा रात्री जेवताना केबलचा चॅनल गाण्यांसाठी मीच पहायचे, तेव्हा तोच असायचा. आणि तिथे असे एकेक "उत्तम, उदात्त, उन्नत" पिच्चर असायचे. तो पर्यंत आमची पांढरू यायचीच तिथे! पांढरू म्हणजे आमची मांजर. तिच्याबद्दल एक स्वतंत्र लेखच लिहीला पाहिजे तेव्हा इथे लिहित नाही. पण मुद्दा असा की ती कुठेही असली तरी टी.व्ही. सुरू झाला की लगेच यायची ... माझ्या रक्षणाकरता! कारण आमचे हीरो, म्हणजे बाबा हो, चॅनल बदलू द्यायचे नाहीत. केबलवर असे महानआणि हुच्च पिच्चर सुरू असायचे आणि बाबांना त्याचा काही फरक पडायचा नाही. ते तल्लीन होऊन जेवायचे आणि दुसरीकडे मटातला अग्रलेख उघडायचे. तो झाला की इंडीयन एक्सप्रेसच्या अग्रलेखाचा नंबर लागायचा. तोपर्यंत भूक जागृत झालेली असायची त्यामुळे मी कधीच उठून टी.व्ही. बदलायचे कष्ट घ्यायचे नाही. शिवाय पांढरू आली की बाकीच्या जगाकडे कोण लक्ष देणार? एकतर प्रत्येक घास किमान ६४ वेळा चावला का नाही याची गणती करायची, पांढरूला पोळी बळेबळे भरवायची, ती पाठीला पाठ घासायला लागली की तिला धक्का द्यायचा असे खेळ चालायचे. मग टी.व्ही. बॅकग्राऊंडला सुरू आणि आम्ही दोघं आपापल्या विश्वात रमून जेवायचो. तर मुद्दा (मी विसरले नाही आहे मुख्य विषय काय आहे ते!) असा की टी.व्ही. मधूनच पहायचा, एखादा खडा आला चुकून, किंवा तिखट लागलं तर विश्वातून बाहेर यायला लागायचं तेवढाच. तर मी तेव्हा नक्की हा पिच्चर पाहिला असणार. पण तेव्हा मला आजच्याएवढी (तरी) सौंदर्यदृष्टी नसल्यामुळे मी तेव्हा या पिच्चरकडे आणि मुख्य म्हणजे ठोंब्याकडे दुर्लक्ष केलं असणार. असो.
तर ... मी असं म्हणत होते, की सुरूवातीला वीजा चमकल्यावर हा ठोंब्या अचानक दिसतो एका बागेत आणि गंमत म्हणजे हवा एकदम मस्त! अहो, क्षणाक्षणाला बदलणार्या हवेसाठी प्रसिद्ध असणार्या सायबाच्या देशातही एवढ्या चटकन हवा बदलत नाही. अर्थात पापणी लवायच्या आत मुंबैहून मिलानला जाणार्या लोकांसाठी हवा बदलणं म्हणजे नक्कीच 'किस झाड की पत्ती' असणार! तर तिथे दिसतो आपला ठोंब्या, एका बागेत, एका फोटोबरोबर, त्याच्या बर्यापैकी किंचितशा सुटलेल्या ढेरीपोटासकट! आणि मग गाणंही सुरू होतं, "जब से हुई है मुहोब्बत, तब से हुई ..." नाही, माझं गाण्याच्या बोलांकडे लक्षच गेलं नाही. माझं सगळं लक्ष होतं ठोंब्याकडे! काय सुंदर नाच बसवला आहे या गाण्यावर! मला एकदम आमच्या शाळेच्या गॅदरिंगची आठवण झाली. एका वर्षी वानखेडे (का वानरवेडे?) सरांनी एक "डॅन्स" बसवला होता त्याची; गाणं होतं,
आता मात्र हसू असह्य झालं; ऑफिसमेट उठून माझ्या डेस्कपाशी आला. मी हेडफोन काढले आणि त्याने लगेच कानावर चढवले. गाणं आणि 'नाच' संपूर्ण पाहूनच त्या स्थितप्रज्ञ माणसाने शांतपणे हेडफोन काढले आणि म्हणाला, "कल के लंच मे मराठी मेन्यू है, तुम्हारा चॉईस क्या है, अळूकी भाजी का मेथी-दाल?"
आता अगदीच भंकसः
एवढं सगळं इथे लिहिताना माझ्या डोक्यात आणखी एक विचार येऊन गेला, आत्तापर्यंत कधीच माझा पहिला नंबर आला नाही, अगदी कुठ्ठे नाही. तेव्हा या भयंकर सुंदर व्हीडीओबद्दल ब्लॉगपोस्ट लिहिणारी मी पहिलीच नसणार. शोधून पहायला पाहिजे!
मला हा व्हीडीओ अनेकांना दाखवायचा आहे. एका वेळेला सगळी नावं आठवतील असं नाही. शिवाय काम करून खूप कंटाळा आला तर हा व्हीडीओ फार मोठी करमणूकही करेल. तर बुकमार्क टाकण्यापेक्षा एक ब्लॉग लिहून ठेवलेला काय वाईट? दिसामाजी काहीतरी(च) ते लिहावे।

हिवर पिवर पिवर पी हिवर पिवर पिवर पी।
पायात पैंजण मी घातलेले, जशी पायमोडी, पायमोडी करणारी ।
असं काहीसं! मी एकदम माझ्या बालपणाच्या 'रम्य' शालेय आठवणीत बुडून गेले. पोहोता येत नाही आठवल्यावर त्या आठवणींतून सरळ पुन्हा गाणं पहायला लागले. तर हा भाई एकदम गडाबडा लोळायला लागला, उठाबशा काय काढायला लागला, गोलगोल काय फिरायला लागला, 'बार' डान्स काय करायला लागला, आहाहा... आणि मग आली एक बया, केशरी ड्रेसवाली, मी तिच्याकडे फारसं पाहिलं नाही. त्या दोघांनी काही नाचायचा प्रयत्न केला.पायात पैंजण मी घातलेले, जशी पायमोडी, पायमोडी करणारी ।
आता मात्र हसू असह्य झालं; ऑफिसमेट उठून माझ्या डेस्कपाशी आला. मी हेडफोन काढले आणि त्याने लगेच कानावर चढवले. गाणं आणि 'नाच' संपूर्ण पाहूनच त्या स्थितप्रज्ञ माणसाने शांतपणे हेडफोन काढले आणि म्हणाला, "कल के लंच मे मराठी मेन्यू है, तुम्हारा चॉईस क्या है, अळूकी भाजी का मेथी-दाल?"
आता अगदीच भंकसः
एवढं सगळं इथे लिहिताना माझ्या डोक्यात आणखी एक विचार येऊन गेला, आत्तापर्यंत कधीच माझा पहिला नंबर आला नाही, अगदी कुठ्ठे नाही. तेव्हा या भयंकर सुंदर व्हीडीओबद्दल ब्लॉगपोस्ट लिहिणारी मी पहिलीच नसणार. शोधून पहायला पाहिजे!
मला हा व्हीडीओ अनेकांना दाखवायचा आहे. एका वेळेला सगळी नावं आठवतील असं नाही. शिवाय काम करून खूप कंटाळा आला तर हा व्हीडीओ फार मोठी करमणूकही करेल. तर बुकमार्क टाकण्यापेक्षा एक ब्लॉग लिहून ठेवलेला काय वाईट? दिसामाजी काहीतरी(च) ते लिहावे।
Tuesday, April 21, 2009
Beauty and brains
They always says "beauty never comes with brain" or "while choosing your partner, don't look at the beauty". I sometimes wonder why is beauty always compared with brains. Are these two related at all? I think yes, none are under one's control. Well, these days one can undergo a plastic and/or cosmetic surgery and try to be "more beautiful", but let us forget that for a moment. Both beauty and brains are there by birth and one cannot control either. There is some similarity. Why are they considered different then?
Brain is always with you (if you have a non-zero initial value for that!), that is something one can trust upon; again there are some exceptions, like people suffering from dementia, Alzheimer's disorders etc, but that is not (yet!) a big fraction of the society. So whatever inherited is always there when we talk about brains. But that is not really true about beauty. The so called beauty cannot stand aging. Again there are exceptions, but not a lot! That is the reason brains get more votes to beauty!
These thoughts matter when one wants to choose a partner for life (marriage). My choice, I chose a brainy guy who is handsome too!
On a lighter note: What if there are more beautiful people casting their votes compared to brainy ones?
My sincere thanks to two friends, from their conversation I started to think about this.

Monday, April 6, 2009
(मी एकदा चहा केला)
प्रेरणा
काल अचानक डोक्यात आले
चहा बनवून पाहू वाटले
चहा बनवायला लागतेच काय?
चहा, साखर अन थोडीशी साय
भरकन जाऊन खरेदी केली
आधणासाठी छोटी पातेली घेतली
आधी काकूला फोन केला
चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला
हाय! मांजर आडवं गेलं
दूधच सगळं नासकं निघालं
शोधाशोध करून झाली
दुकानदारांनी नन्ना केली
काय करावं मला समजेना
चहाची तल्लफ शांत बसू देई ना
कपाट सगळं एकदा उचकटलं
एक्स्पायरी उलटलेलं बिस्कीट मिळालं
शेवटी मिल्कमेडचा डबा सापडला
चहाचा पाठलाग सुरू झाला
पातेली घासून सुरूवात केली
आधण आणि साखर मोजली
तेव्हाच उतावळेपणा नडला
मिल्कमेडच्या डब्ब्याला हात लागला
मिल्कमेडच्या डब्यानं नाक घासलं
जमिनीवर पावडरचं साम्राज्य झालं
जाम वैतागून रंगभेद विसरले
काळ्या चहाच्या नादाला लागले
माझंच कर्म, आडवंच आलं
साखरेऐवजी मीठच घातलं
तोंडात घातलेलं घशाशी आलं
चहानं माझं नाकच कापलं
शेवटी सगळा नाद सोडला
सगळा पसारा नीट आवरला
आज जरा विचार केला
जरी कालचा बेत फसला
काय घडले तेच सांगावे
विडंबनरुपाने सादर करावे
आता हे विडंबन संपवते
पोळ्या लाटायला आत जाते
काल अचानक डोक्यात आले
चहा बनवून पाहू वाटले
चहा बनवायला लागतेच काय?
चहा, साखर अन थोडीशी साय
भरकन जाऊन खरेदी केली
आधणासाठी छोटी पातेली घेतली
आधी काकूला फोन केला
चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला
हाय! मांजर आडवं गेलं
दूधच सगळं नासकं निघालं
शोधाशोध करून झाली
दुकानदारांनी नन्ना केली
काय करावं मला समजेना
चहाची तल्लफ शांत बसू देई ना
कपाट सगळं एकदा उचकटलं
एक्स्पायरी उलटलेलं बिस्कीट मिळालं
शेवटी मिल्कमेडचा डबा सापडला
चहाचा पाठलाग सुरू झाला
पातेली घासून सुरूवात केली
आधण आणि साखर मोजली
तेव्हाच उतावळेपणा नडला
मिल्कमेडच्या डब्ब्याला हात लागला
मिल्कमेडच्या डब्यानं नाक घासलं
जमिनीवर पावडरचं साम्राज्य झालं
जाम वैतागून रंगभेद विसरले
काळ्या चहाच्या नादाला लागले
माझंच कर्म, आडवंच आलं
साखरेऐवजी मीठच घातलं
तोंडात घातलेलं घशाशी आलं
चहानं माझं नाकच कापलं
शेवटी सगळा नाद सोडला
सगळा पसारा नीट आवरला
आज जरा विचार केला
जरी कालचा बेत फसला
काय घडले तेच सांगावे
विडंबनरुपाने सादर करावे
आता हे विडंबन संपवते
पोळ्या लाटायला आत जाते
Wednesday, December 3, 2008
Are we just going to talk about it?
Since the city of Mumbai was facing terror attacks I was and am very much upset about the things and the way they are being handled. I went to the office and realized how bad the situation was! My officemate started talking about the condition and of course the conversation went on the track of the politicians in this country. How they are all useless, shameless people blah blah blah. Later there was an addition, that the media is also the same. There were hot discussions everywhere, in the office, in the canteen, at home, on phone, on misalpav where I normally write in Marathi, everywhere. Mostly people were angry with the politicians and the media and of course on the education system, the middle class etc.
Honestly, I am just bored of all this discussions. They don't have any conclusion, many times there is at least one person at least who will be hot-headed and the entire conversation will be absolutely useless. Mostly these people don't think before talk, cannot control their emotions and cannot think logically, rationally about the issue. But the worse thing is, most of us just like to talk about this. We just talk about this, we will forget it in a few days and things will be normal once again ... just to get distorted by another terrorist attack. And now it's enough for me, I have reached my tipping point.
I cannot take this anymore. I have got a feeling that I am also responsible all this. Because I am also one of those who never tried anything to stop this. And this is enough. I lived without doing anything till now, but I don't want to die without taking any efforts.
I want to do something creative and constructive. I know that it might not change anything. But nobody doing anything won't change anything for sure. If one works then there is hope. I don't really know what can I do. There are some people out there who want to do something and that is enough for me for the moment. So if you have a concrete plan about what do or you have a wish to work then only talk to me. Or else know what ... I don't really give a ****.

Labels:
contructive work,
discussion,
terror attacks
Tuesday, November 25, 2008
Don't go to Abs!
It was around the early summer time, I was still waiting for a reply regarding my job application at NCRA and was getting bored in this new (for me) city, Pune. So I decided to join a gym near my home called, Abs for Her. On the first day a "smiley face" welcomed me and introduced me to the gym; she tried to make herself sound like a husky and sweet woman at the same time. That was very confusing and of course did not work on a logical brain inside a female body. "Oh yeah, and we have a dietitian here, too", "Ohh, alright", was my reply, but in my head the thoughts were like, "Right! I am not that fat or old or ill that I really need someone to tell me that I should avoid fats and carbohydrates and should eat more proteins, vitamins and fibers!". This is what any traditional mum from Marathi middle class families will tell you for sure.
I started going to the gym, it was alright and a little expensive as well. More than 2K per month which is almost 100 rupees an hour. Yeah, they are closed on Saturdays and Sundays; and of course didn't bother to tell me about this initially. But I continued over there for about 5 months and took a break for 2 months. I got another offer from these people, on 3 months subscription, 3 months will be free. So I decided to get my gym clothes out again. I started going to the gym again from the start of November.
Bly me, they had not changed the yoga-mats, the gym was full with women of all ages, sizes and energy levels. In my batch, we used to be 6-7, and now we are at least 10 every day. Most of them are very sluggish and fat. We are asked to run in a circle over there, but except for a 2 or 3 none of them actually can run; at most they jog for half a minute and start walking. For that small hall, 6 or 7 will be a "crowd" but now since these ABs people want to make a lot of money, more than 10 women are crammed in a batch. Most of these women have a lot of money but don't have the drive to work out, which is very discouraging. Glad that some of the active batch-mates are still there so that we can look at each other and push ourselves to our limit and even beyond!
But in all the condition of the gym is just horrible. We asked for a few more sets of light weights and the answer is "Why don't you increase your intensity?". Imagine a female astronomer or an IT professional with curvy biceps instead of a curvy "figure"! ;-) We asked them to clean the floor but the excuse is the cleaner is absent for a few days. In a place like a gym, the floor is full of rubbish, hair, dust, pieces of yoga mats and we are supposed to lie down over there while working out. They charge us 100 rupees an hour (or 50 considering the discount) and not provide a clean and hygienic environment, a neat set of enough dumbbells, yoga mats in a good condition, etc. BUT ... they provide us a dietitian, the one who behaves like a perfect college student. "So .... where is your diet diary?", and her accent makes me laugh very loudly. She asked me the other day to eat extra protein, although my body never asked me for that. I am sure the body has a very good feedback mechanism. Honestly, sometimes I feel that I know a lot more about diet than her.
But the gym instructors are very nice. I have good experience with all of them, at least 5 of them. They are very nice, friendly girls and do their jobs very well. At least that's not that bad; apart from that I don't have any praises for Abs!
I just wish they at least read this and not turn a deaf ear to the complaints again!

Sunday, November 23, 2008
तुम्हाला देशाची सध्याची अवस्था आवडत नाहिये?
"काय, उद्याच्या सुट्टीचा काय प्लॅन?", "काही खास नाही, सकाळी लवकर उठून गर्दी वाढायच्या आत मतदान करुन येईन आणि मग आहेच आख्खा दिवस कामं नाहीतर कुचाळक्या करायला!" "काय? एवढी सुट्टी चालून आल्ये आणि तुम्ही लोकं मतदान करायला लवकर उठणार, त्यापेक्षा सगळे दोन दिवस फिरायला जाऊ या." तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय घरांतल्या तरूण-तरुणींसाठी हा संवाद अजिबात नवा नाही. किंवा, "जाऊ दे रे, मतदान करायचं असेल तरीही कोणाला मत देणार? सगळे साले सारखेच ******. त्यापेक्षा घरात बसू, मुलांबरोबर नाहीतरी कधी वेळ घालवणार? चांगली सुट्टी आली आहे." मध्यमवयीन आणि म्हातार्या माणसांचं हे मत! पण आपल्या मताची किंमत किती हे आपल्याला खरंच कळतं का? 'मतदान करा' असं तथाकथित नेते सांगत फिरतात आणि त्याला गरीब, झोपडपट्टीत रहाणारी, न शिकलेली जनता प्रतिसाद देते आणि आपण मात्र घरात बसून नाहीतर बाहेर फिरायला जाऊन 'सुट्टी'चा आनंद घेतो.
आजच्या घडीला, स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष होऊन गेल्यावर, भारतात साधारण ५५% बेरोजगारी आहे, ४०% लोकं निरक्षर आहेत आणि साधारण एक तृतीयांश म्हणजे ३०% लोकं दारिद्र्यरेषेखाली आहेत. दरवर्षी सहा लाख अभियंतेशिक्षण संपवून महाविद्यालयातून बाहेर पडतात, त्यातल्या एक लाख लोकांना लगेचच नोकर्या मिळतात, अडीच लाख लोकांना काही काळ वाट बघून नोकर्या मिळतात आणि बाकीचे? ते लोकं अश्याच काहीतरी, कुठेतरी नोकर्या करतात. एकूण लोकसंख्येच्या फक्त १% लोकं व्यक्तिगत आयकर भरतात आणि संसदेच्या अधिवेशनासाठी दर दिवशी २ कोटी रुपये खर्च होतात (त्यातसुद्धा किती वेळ प्रत्यक्ष कामकाजासाठी होतो हा वेगळा प्रश्न!). हा विरोधाभास का? शेतकर्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून ७२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज काढलं, त्याचं 'श्रेय' उपटण्याची घाणेरडी लढाईही आपण पाहिली. पण साधारण ५०% शेतकर्यांना संस्थात्मक पातळीवर पतपुरवठा होत नाही याचा विचार केला गेला का? अर्थात नाही. नव्वद टक्क्याहून अधिक शेतकर्यांच्या जमिनी एक हेक्टरपेक्षा कमी आकाराच्या आहेत त्यांच्यासाठी काही मदत होते का? कधी असा प्रयत्न होतो का की या शेतकर्यांना एकत्र करुन सहकारी तत्त्वावर शेती करावी. अशा हजारभर शेतकर्यांना जर एकत्र केलं तर यांत्रिक शेती करणं परवडेल, उत्पादन वाढेल आणि शेतकर्यांचा उत्कर्ष होईल. माननीय कृषिमंत्री शेतीवरचा भार कमी करा असं म्हणतात पण शेतांच्या वाटण्यांमुळे बांधातच किती टक्के सुपीक जमीन पडीक रहाते त्याचा विचार कोण करणार?
मग आजच्या जमान्यातले, योग्य दिशेने विचार करणारे लोकं आहेत कुठे?मागच्या, २००४ सालच्या, लोकसभेच्या निवडणूकांमधे साधारण ६७% (म्हणजे ~ ६७ कोटी) लोकं मतदार यादीमधे होते. आणि राजकीय पक्ष होते २२०, त्यातले सहा राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. एकूण मतांच्या फक्त १५% मतं काँग्रेसला मिळाली ज्या पक्षाचा पंतप्रधान झाला. एकूण मतांच्या जेमतेम ४% मतं मिळवणारे डावे पक्ष तेवढीच वर्ष संपूर्ण देश 'वाचवण्या'ची जबाबदारी आपलीच आहे असा खोटा अभिनिवेष बाळगून संपूर्ण देशाला वेठीला धरत होते. भारताची साधारण अर्धी जनता आज तरूण (३० वर्षापेक्षा लहान) आहे. आणि अजून एक विरोधाभास बघा, भारताचे मनुष्यबळ विकास मंत्री आहेत फक्त ८८ वर्ष, १८ दिवसांचे! युवा आणि खेळ मंत्री आहेत ७७ वर्षांचे!! स्वतंत्र भारतातली सध्या असलेली (२००४ च्या निवडणूकांमधे निवडून आलेली) ही १४वी लोकसभा! पहिल्या लोकसभेपासून पाहिलं तर ५५ वर्षांवरच्या लोकसभा सदस्यांची संख्या वाढतच जात आहे. म्हणजे एकदा लोकसभा सभासद म्हणून निवडून आलं की मग खुर्ची सोडायची नाहीच, जोपर्यंत एकतर मतदार घरी बसवत नाहीत किंवा वरुन बोलावणं येत नाही. त्यातही पहिल्या कारणास्तव लोकसभेबाहेर असाल तर थोडंफार "आळंदी-पंढरी"करून, करायची सवय असेल तर मग राज्यसभा सभासद व्हा आणि मंत्री व्हा, उदा. सध्याचे माननीय संरक्षण मंत्री (हे पण सत्तरीच्या पुढचे आहेत). म्हणजे हे असे सगळे 'वयोवृद्ध', 'अनुभवी' लोक देशाचं नेतृत्त्व करतात, पुढच्या पिढीसाठी तरतूद करतात; पण पुढच्या पिढीसमोर काय वाढलेलं असणार आहे याची या मान्यवरांना खरोखर कल्पना आहे का, असू शकते का? आणि त्याहीपुढे आजची जी भारताची बहुसंख्य जनता आहे त्यांचे हे सगळे 'प्रतिनिधी' आहेत का, वाटतात का? देशात शिक्षणाची दुरवस्था आहे, आहे ते शिक्षण रोजगाराभिमुख नाही, कुवत असलेल्या लोकांची बुद्धीमत्ता योग्य ठिकाणी वापरली जात नाही, पुढच्या पिढीला कोणत्या संकटांसाठी तयार करावं लागणार आहे याचा विचार नाही, आणि कारण बहुतांशी एकच, आज निर्णय घेणारे लोकं कालच्या जमान्यातले आहेत. आणि त्यांनाही आहे ती व्यवस्था बदलण्याची गरज वाटत नाही, कारण एकच; आहे त्या व्यवस्थेत त्यांना पदं मिळालेली आहेत. आपले मध्यमवर्गाचे प्रतिनिधीकुठे आहेत?
आपण मध्यमवर्गीय म्हणजे कोण? आपण जे शिक्षणाला प्रथम प्राधान्य देतो, जी कोणती परीक्षा असेल तिला सामोरे जातो आणि त्याहीपुढे जाऊन मेरीटोक्रॅट्स (गुणवत्ताशाही?) आहोत. आपणच ते लोकं आहोत, जे वेळेत कर भरतो, आणि तरीही आपल्या घरांतली मुलं पूर्ण फी भरून खासगी शाळेत जातात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारच कमी वेळा वापरतो (एवढ्या गर्दीत मारामारी करुन चढणं अशक्य असतं, नाहीतर आपल्याला अर्धा तासापेक्षा स्कूटर, चारचाकी स्वस्त वाटते), कर्जमाफी, वीजबिलमाफी या सगळ्याचा आपल्याला काहीही फायदा नसतो. आणि एक आहे तो वंचित घटक, ज्यांच्या मुलांना शाळेत पाठवलं तर घरचं उत्पादन कमी होतं, परिणामी मुलं शाळेत जात नाहीत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही परवडत नाही, त्यामुळे अगदीच नाईलाज असेल तरच तिचा वापर होतो, आणि स्वतःची शेती, मालमत्ता नसतेच की कर्जमाफी आणि फुकट वीज मिळावी! आपण लोकं रस्त्यावर जाऊनघोषणाबाजी करत नाही, ना सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करतो. पण सध्या आपण आपल्यापुरता (स्वार्थी?) विचार करु या, जो नेहेमीच करतो. तर आपण आहोत मध्यमवर्गाचे एक घटक. आपण आहोत किती? भारताच्या (साधारण) १००-१२०(?) कोटी लोकसंख्येत २०१० साली आपण साधारण असू ३० कोटी, आणि त्यातले मतदानासाठी पात्र लोकं असतील (एकूण मध्यमवर्गाच्या) ६६% किंवा २० कोटी. आता थोडं पुन्हा मागे जाऊ या, मागच्या लोकसभेत काँग्रेसला मिळालेली होती एकूण मतांच्या १५% मतं! म्हणजे मध्यमवर्गाची एकूण मतं असतील २०% पेक्षा जास्त, (सगळेच्या सगळे १०० कोटी लोकं मतदानासाठी पात्र नसणार) आणि त्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी मतदान केलं तर केवढी प्रचंड मतपेटी आणि दबाव गट तयार होईल! अर्थात हा मध्यमवर्ग देशाच्या कानाकोपर्यात समानतेने विखुरला नाही आहे. आहे तो सगळा मुख्यतः चार महानगरींमधे आणि राज्यांच्या राजधान्यांमध्ये! आणि लोकसभेच्या एकूण ५५२ जागांपैकी साधारण १५० जागा, (सध्या काँग्रेसच्या आहेत १५३ जागा). त्यामुळे या मध्यमवर्गाने एकत्र येऊन मतदान केलं, आणि तेही चांगल्या उमेदवाराला किंवा वाईट उमेदवाराविरूद्ध तरीही बराच फरक पडू शकतो. वाईट उमेदवारांविरुद्ध मत देण्याची आपल्या घटनेत सोय आहे, पण अजून तेआपल्याला 'दिसत नाही'. कलम ४९-ओ प्रमाणे, एकाही उमेदवार लायक नाही या कारणास्तव मी मतदान करत नाही असा पर्याय दिला पाहिजे, पण तो मिळत नाही. (याबद्दल मला फार माहिती नाही, माहितगार लोकांनी यावर उजेड टाकावा.)
ं मग लायक उमेदवार कोण? कालच मी एका मिटींगसाठी गेले होते, ती होती प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडीया या राजकीय पक्षाने आयोजित केलेली. पुणे पश्चिम या भागासाठी असलेल्या या मिटींगला साधारण ८० एवढी उपस्थिती होती. तिथे असलेले 'राजकारणी' आपल्यासारखेच दिसत होते. कुणाच्याही डोक्यावर ना गांधी टोपी, ना कोणी भगवे टिळेवाले, ना कुठे झेंडे उभारलेले आणि प्रेक्षकात ना कोणी पिडलेले, असहाय्य चेहेरे! वाव्व, राजकीय पक्षाच्या मिटींगला काहीही भंपकपणा सुरु नव्हता. (अर्थात मी इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या मिटींगला गेलेले नाही आहे त्यामुळे निश्चितपणे सांगता येत नाही, पण एक डोक्यातली कल्पना!) या पक्षाची कल्पना तीच आहे, ज्या लोकांना विचार करता येतो, ज्या लोकांची विचार करण्याची कुवत आहे ती लोकं निर्णय घेण्यार्या खुर्चीवर पाहिजेत. राजकारण हे येरागबाळ्याचं काम नाही, आणि ते अतिशय व्यावसायिक पद्धतीने हाताळल गेलं पाहिजे अशी त्यांची विचारधारा आहे, म्हणूनच पक्षाचं नाव, 'प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडीया'. जे 'राजकारणी' तिथे उपस्थित होते ते सगळे नोकरदार किंवा स्वतःचा उद्योगधंदा असलेले, वीस-वीस वर्ष आय.टी. उद्योगात अनुभव असलेले, देश-विदेशात फिरून आलेले, सैन्यातून निवृत्त झालेले, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे दिसले; पण एक समान धागा सगळ्यांमधे, सगळेच मध्यमवर्गातले, घरात बसून चहा पिताना "राजकारण घाणेरडं असतं" म्हणून बोलणारे आज ती घाण साफ करायला तयार झालेले आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांचा (पक्षाचा) सात वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी (सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शेतकी, शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक या आघाड्यांवर) वचननामा (मराठीत मॅनिफेस्टो) आहे. (याची विस्तृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर आहे.) स्वतःबद्दल कुठल्याही प्रकारच्या अतिरंजित कल्पना, अपेक्षा, गोंधळ त्यांच्या डोक्यात आहे असं वाटलं नाही. आणि अर्थात या पक्षाचं वयही कमी (एक वर्षाच्यावर थोडं) असल्यामुळे या लोकांकडे प्रश्नांची उत्तरं आहेतच असं नाही. पण "आमच्याकडे आज या प्रश्नाचं उत्तर नाही, तुम्ही या आमच्याबरोबर आणि आपण सगळे मिळून याही मुद्द्याचा विचार करु या" एवढा प्रामाणिकपणा आणि प्रांजळपणा त्यांच्याकडे दिसला. त्यांची प्रश्न, समस्यांकडे बघण्याची पद्धत टॉप-डाऊन (प्रतिशब्द?) आहे. आपल्याला घरासमोरच्या रस्त्यावर एक खड्डा दिसला तर तो आपण बुजवून टाकू, पण सगळ्याच रस्त्यांवर खड्डे दिसले तर मात्र एकेक खड्डा बुजवण्यात अर्थ नाही, आता गरज आहे ती पद्धतशीरपणे खड्डे पडणारच नाहीत अशा विचारांची! या विचारांतून हे मध्यमवर्गीय एकत्र आलेले आहेत.
या मिटींगच्या शेवटी मी स्वतःलाच प्रश्न विचारला, "आपल्या देशात 'यंव खराब आहे आणि त्यंव वाईट आहे' असल्या तक्रारी करण्याऐवजी मी काय करू शकते. कमीतकमी मी मतदानाच्या दिवशी बाहेर पडूनयोग्य मतदाराला मत तर नक्कीच देऊ शकते."
{डिस्क्लेमर} मी या पीपीआय किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाची सभासद नाही. एक चांगलं काम करणारे लोकं दिसले त्यांची ओळख जास्तीतजास्त लोकांना व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच! {बॅकस्लॅश डिस्क्लेमर}

Subscribe to:
Posts (Atom)