प्रेरणा
काल अचानक डोक्यात आले
चहा बनवून पाहू वाटले
चहा बनवायला लागतेच काय?
चहा, साखर अन थोडीशी साय
भरकन जाऊन खरेदी केली
आधणासाठी छोटी पातेली घेतली
आधी काकूला फोन केला
चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला
हाय! मांजर आडवं गेलं
दूधच सगळं नासकं निघालं
शोधाशोध करून झाली
दुकानदारांनी नन्ना केली
काय करावं मला समजेना
चहाची तल्लफ शांत बसू देई ना
कपाट सगळं एकदा उचकटलं
एक्स्पायरी उलटलेलं बिस्कीट मिळालं
शेवटी मिल्कमेडचा डबा सापडला
चहाचा पाठलाग सुरू झाला
पातेली घासून सुरूवात केली
आधण आणि साखर मोजली
तेव्हाच उतावळेपणा नडला
मिल्कमेडच्या डब्ब्याला हात लागला
मिल्कमेडच्या डब्यानं नाक घासलं
जमिनीवर पावडरचं साम्राज्य झालं
जाम वैतागून रंगभेद विसरले
काळ्या चहाच्या नादाला लागले
माझंच कर्म, आडवंच आलं
साखरेऐवजी मीठच घातलं
तोंडात घातलेलं घशाशी आलं
चहानं माझं नाकच कापलं
शेवटी सगळा नाद सोडला
सगळा पसारा नीट आवरला
आज जरा विचार केला
जरी कालचा बेत फसला
काय घडले तेच सांगावे
विडंबनरुपाने सादर करावे
आता हे विडंबन संपवते
पोळ्या लाटायला आत जाते
3 comments:
Ha..Ha..Ha..chhan aahe.
:D :D :D
धन्यवाद मैथिली.
लय भारी. तुझा नवरा फारच सहनशील दिसतोय. साध्या चहासाठी इतकी मारामारी. मग नंतर लाटलेल्या पोळ्यांचे काय?
पण बडबडगीत म्हणून माझ्या मुलीला शिकवतो.
Post a Comment