स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांनी पुरूषांची बरोबरी करणं नव्हे! पुरूषांनी सुरू केलेला / ठेवलेला भेदाभेद, भांडणं, हिंसा, युद्धं स्त्रियांनीही करणं स्त्रीमुक्तीला मान्य नाही.
राजसत्तेपेक्षा जास्त प्रभावी आणखी एक संस्था कार्यरत होती, पुरूषसंस्था; स्त्रियांचं शिक्षण सुरू झाल्यावरही फार पुढे गेलं नाही कारण ही दुसरी सत्ता!
खरे स्त्रीमुक्तीवाले स्त्रीच्या मातृत्त्व, वात्सल्य यांना स्त्रियांचे 'दुर्गुण' समजत नाहीत. इ.इ.
पुस्तक आता खूपच चांगलं वाटत आहे; 'बड्डे गिफ्ट्स' काय आणायची याची चिंता आणखी कमी झाली! ;-)
अवांतरः विषमता आपल्या सगळ्यांमधेच किती भिनली असावी?
मागच्या आठवड्यात लंचटेबलवर मी पोहोचले तर 'देव' या न संपणार्या विषयावर चर्चा सुरू होती. मी तिथे गेले आणि काय चर्चा सुरू आहे याचा कानोसा घेतला. सगळ्यांनी माझ्याकडे "माझं मत काय?" अशा चेहेर्याने बघायला सुरूवात केली.
Me: What are we talking about?
Reply: About existence of God.
Me: About what??
Reply: About God.
Me: About whom??
Reply: About God ...
Me: About whom??
आणि अजून दोन-चारदा मी तोच प्रश्न विचारल्यावर माझा प्रतिसाद 'पोहोचला'.
अर्चना, एक मल्लू मुलगी, सध्या इंजिनियरींगच्या तिसर्या/चौथ्या वर्षाला आहे, ती इथे ट्रेनी म्हणून आली आहे. घरातून पहिल्यांदाच एकटी बाहेर पडली आणि आमच्या या अजब-प्राणी-संग्रहालयात येऊन पडली आहे. ती हिरीरीने मला समजवायचा प्रयत्न करत होती, देव आहे म्हणून! माझा तोच प्रश्न, "नक्की कोण आहे?"
शेवटी ती लेक्चर्सची वेळ झाल्यावर गेली. आणि नंतर माझी चौकशी माझी मैत्रिण आहे, आरती, तिच्याकडे केली. आरतीकडून कळलेले अर्चनाचे उद्गार, "म्हणजे, तिचं लग्नं झालंय? एक लग्नं झालेली मुलगी असून तिचा देवावर विश्वास नाही!?!"
अजूनही यावर हसावं का रडावं मला समजलेलं नाही.
3 comments:
"म्हणजे, तिचं लग्नं झालंय? एक लग्नं झालेली मुलगी असून तिचा देवावर विश्वास नाही!?!"
Ultimate हा! हा! हा!
काय हे माऊ, तुझे लग्न होऊन ही तुझा दैवावर अन देवावर विश्वास नाही ? अग नवरा हा दैवाने दिलेला देव आहे ;-)
बाकी सध्याच्या काळात'पैसा म्हणजेच देव' हे निर्विवाद सत्य ! बाकी प्रतिसाद सविस्तर देईन.
~ वाहीदा
खरे स्त्रीमुक्तीवाले स्त्रीच्या मातृत्त्व, वात्सल्य यांना स्त्रियांचे 'दुर्गुण' समजत नाहीत. इ.इ.
खरे स्त्री मुक्तीवाले विजीगीषु वृत्ती, महत्त्वाकांक्षी वृत्ती, थोडीशी दांडगाई जी काही ठिकाणी आवश्यक असते त्यालाही दुर्गुण समजत नसतील अशी आशा आहे. तसं नसेल तर त्याला दुटप्पीपणा म्हटलं पाहिजे.
पुरूषांनी सुरू केलेला / ठेवलेला भेदाभेद, भांडणं, हिंसा, युद्धं स्त्रियांनीही करणं स्त्रीमुक्तीला मान्य नाही.
- भेदाभेद फक्त पुरुषांनीच केला असं लेखक्/लेखिकेला म्हणायचं आहे का ? स्त्रियांवर स्त्रियांनीसुद्धा खूप अन्याय केला आहे या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे.
Thought Facet@: मी स्वतःचाच ब्लॉग उघडायचा कंटाळा नव्हते म्हणून तुमची प्रतिक्रिया आत्ता पहाते आहे. उत्तर देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
>> खरे स्त्री मुक्तीवाले विजीगीषु वृत्ती, महत्त्वाकांक्षी वृत्ती, थोडीशी दांडगाई जी काही ठिकाणी आवश्यक असते त्यालाही दुर्गुण समजत नसतील अशी आशा आहे. तसं नसेल तर त्याला दुटप्पीपणा म्हटलं पाहिजे. <<
अजूनही ते पुस्तक वाचून झालेलं नाहीये. पण आत्तापर्यंत जेवढं वाचलं आहे (आणि आठवतं आहे त्याप्रमाणे) एकूण पुस्तकाचा सूर असा वाटला नाही.
>> भेदाभेद फक्त पुरुषांनीच केला असं लेखक्/लेखिकेला म्हणायचं आहे का ? स्त्रियांवर स्त्रियांनीसुद्धा खूप अन्याय केला आहे या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे.<<
नाही. पण लेखिकेचं म्हणणं आहे की फक्त पुरूषांची बरोबरी करायची म्हणून सैन्यात जाऊन बाँब टाकणं चुकीचं आहे. बरोबरी करायला हरकत नाही पण डोळसपणे करा.
बाकी स्त्रियांवर स्त्रियांनीसुद्धा खूप अन्याय केला आहे हे नीटसं कळलं नाही.
Post a Comment